जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

बडगाम: जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील अरिबाग मचामा परिसरात झालेल्या चकमकीत आज बुधवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांशी लढतांना एक जवान जखमी झाला आहे. ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते. यातील एक जण पाकिस्तानचा रहिवासी होता. तर दुसरा पुलवामा जिल्ह्यातील होता. अरिबाग मचामा भागात दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळनंतर जवानांनी परिसरास घेराव दिला व शोधमोहीम सुरू केली होती. जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, त्यास जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. यामुळ सुरू झालेल्या चकमकीत अखेर दोन दहशतवद्यांचा खात्मा झाला. तर एक जवान जखमी झाला.

Copy