जनावरे घेऊन जाणार्‍या वाहनाने पोलिसांच्या वाहनाला उडवले!

0

नवापूर। गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले असून सात गुरांना जीवदान मिळाले आहे. कारवाईमुळे चिढून वाहनचालकाने पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने पोलिस वाहनातील तीन पोलिस कर्मचार्‍यांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन जण फरार झाले.

नवापूर येथील जनतापार्कमधील जहाँगिर इस्माईल शेख हा व्यक्ती वाहन क्र एम.एच.10ए.क्यु. 1430 मध्ये सात गुरे कोंबुन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरविहीर जिल्हा परिषद शाळेसमोर रायपुरबारी रस्त्यावर सदर वाहन आले असता थांबविण्याचा इशारा केला. माञ वाहनचालकाने वाहन न थांबविता उलट भरधाव वेगाने वाहन पळवुन नेले. पोलिसांनी सरकारी वाहन क्र.एम.एच.39 ए.263 ने सदर वाहनाचा पाठलाग केला. पोलीस कारवाई करतील या भितीने त्याने पोलिसांच्या वाहनाला धडक दिली. यामध्ये सपोनि प्रल्हाद राजपुत, पो.ना.नरेंद्र नाईक, पो.कॉ.आदिनाथ गोसावी या तिघांना दुखापत झाली. अपघात घडताच वाहनचालक जहॉगिर व दोघे फरार झाले. वाहनातील 7 गुरांची मुक्तता करण्यात आली.