जनसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून ते हाकताय रावेरचा गावगाडा

प्राध्यापक होण्याचे स्वप्न भंगले : मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी साधला ‘जनशक्ती’शी संवाद

 

 

रावेर (शालिक महाजन) : जिद्द आणि चिकाटी सोबत मनाची तयारी असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. आताच्या युवकांनी स्वप्न नक्की बघाव ते मिळवण्यासाठी अहोरात्र परीश्रम सुध्दा घ्यावे परंतु जर पूर्ण नाही झाले तर निराश न होत जे मिळाले त्यातच समाधान मानावे. मलादेखील प्रोफेसर होण्याचे स्वप्न होते, त्या दिशेने मी प्रयत्न सुध्दा केले परंतु एमपीएससीचा अभ्यास करून दुसर्‍या प्रयत्नात मुख्याधिकारी झालो आणि रावेर पालिकेचा गाडा हाताळत असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

रणनीतीद्वारेच करावे मार्गक्रमण
रावेर नगरपालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी गुरुवारी खास संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या जीवनातील अनेक उतार-चढाव सांगितले. आताचे युवक स्पर्धा परीक्षाकडे नक्की जावे परंतु जीवन जगण्याची रणनीती तयार करूनच मार्गक्रमण करावे. स्पर्धा परीक्षेत यश न आल्यास व्यापार किंवा इतर उद्योग धंद्याकडे जावे. यातदेखील क्रांती करता येते. यासाठी अंगी फक्त जिद्द आणि चिकाटी असावी लागते.

प्रोफेसर होण्याच स्वप्न पण…!
रावेर पालिकेचे युवा 30 वर्षीय मुख्याधिकारी रवींद्र लांडे हे मूळचे धोरजळगाव (ता.शेवगाव जि.नगर) लांडे यांच्या परीवारात वडील शिवाजीराव लांडे हे साखर कारखाण्यात कामगार होते. आई राहुल व एक बहिण सर्वसाधारण कुटुंबातुन येणारे रवींद्र लांडे यांचे शिक्षण गावाबाहेर शहरी भागात झाले आहे. एमएस्सीपर्यंत शिक्षण घेणारे रविंद्र लांडेंना प्रोफेसर होण्याच स्वप्न होते मात्र मित्रांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेकडे वळले व दुसर्‍याच प्रयत्नात एमपीएससी उतीर्ण होऊन मुख्याधिकारी झाले. यापूर्वी ते नाशिक जिल्ह्यातत पेठ व दिंडोरी या लहान पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे आणि आज 40 हजार लोकसंख्या असलेल्या रावेर नगरपालिकेचा गाडा हाताळत आहे.

अधिकाधिक सुविधा पुरवणे हीच माझी जबाबदारी
रावेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेली हद्दवाढ असो की महाभयंकर कोरोना काळ रवींद्र लांडे नेहमी सांगतात प्रत्येक दिवस सर्वांना नवीन शिकवत असतो. लांडे यांच्या काळात शासनाचे वसुंधरा अभिया, माझे कुटुंब माझी जबाबदारी, हद्दवाढ, घरकुल योजना, शौचालय योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. आता हद्दवाढ झालेल्या वस्तीत जास्तीत-जास्त सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 35 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना हद्दवाढ झालेल्या भागासाठी प्रस्तावित केल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

शहरातील मुलांसाठी लवकरच स्टडी सेंटर
रावेर शहरात आठवडे बाजार परीसरात बांधकाम होत असल्याने त्या ठिकाणी रावेर शहरातील युवक व युवतीसाठी पालिके तर्फे स्टडी सेंटर उघडण्याचे व्हिजन रवींद्र लांडे यांचे आहे. यासाठी सुमारे एक लाख रुपयांचे वेग-वेगळे पुस्तके आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Copy