जनसंग्रामच्या ठेवीदारांनी अडवली सहकार मंत्र्याची गाडी

0

जळगाव : जनसंग्रामच्या ठेवीदारांचे उपोषण गेल्या आठ दिवसापासुन जिल्हाधिकारी कार्यालयसमोर अमरण उपोषण सुरू आहे. त्यापार्श्‍वभुंमीवर मंगळवार 20 रोजी सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ठेवीदारांची बैठक घेण्यात आली यावेळी जनसंग्रामच्या संतप्त ठेवीदारांनी मंत्र्यांच्या गाडीला घेरा घालत अडवणुक कराण्यचा प्रयत्न केला. यावेळी ठेवीदारांना आश्‍वासन देऊन तृतास दिलासा दिला आहे. दोन तास चाललेल्या बैठकीत जनसंग्रामच्या ठेवीदारांनी पतसंस्थांनी ठेवी डुबवील्याचा आरोप केला. पतसंस्थाकडून त्यांच्या मालमत्ता विक्री करून ठेवीदारांना परत करण्यात याव्या अशी मागणी यावेळी केली. मात्र ना.गुलाबराव पाटील यांच्याकडून बैठकीत ठेवीदारांना निर्णय न मिळाल्यामुळे बाहेर येऊन संतंप्त ठेवीदारांनी घोषणा बाजी करत त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी तृर्तास दिलास मिळावा म्हणुन ठेवीदारांच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी सहकार आयुक्त दळवी, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, तसेच सहकार खात्यातील अधिकारी उपस्थित होते.