Private Advt

जनशक्ती जनमत : हा तर जनतेचा विश्वासघातच

भुसावळ : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना राज्यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘जनशक्ती’ने तीन प्रश्नांच्या आधारे जनमत जाणून घेतले. सत्तांतरात राजकीय पदाधिकार्‍यांचे प्रश्न सुटत नसतील तर जनतेचे काय सुटणार शिवाय हा तर जनतेचा विश्वासाघातच असल्याची भावना मुक्ताईनगर तालुक्यातील तारखेड्याचे दीपक वाघ (9373807449) यांनी व्यक्त केली आहे.

यासाठी कायदाच हवा
दीपक वाघ कळवतात की, आमदाराने पक्षांतर करताना जनतेला विचारात घेणे गरजेचे आहे मात्र घटनेने जे अधिकार दिले आहेत त्यामुळे जनतेला सर्व गुपचूप सहन करावे लागत आहे. जनता जो कौल देईल ते मान्य करूनच सरकार स्थापन करायला हवे यासाठी कायदा होणे गरजेचे आहे शिवाय राज्यातील घडामोडी म्हणजे घोडे बाझारच असून हा तर जनतेचा विश्वासघात आहे. कारण ज्या अपेक्षेने जनता मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड करते त्या मतांचा अनादर करून व्यक्तीगत स्वार्थापोटी या गोष्टी करणे अत्यंत चुकीचे आहे. राजकारण्यांचे प्रश्न सुटत नसतील तेथे जनतेचे काय प्रश्न सुटतील? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.