जनशक्ती इनसाईड स्टोरी : नाराज आमदार परत आले नाहीत तर नार्वेकर यांचे शिवसेनेचं पद धोक्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मंत्री एकनाथ शिंदे आणि नाराज आमदार यांना मनवण्याची जवाबदारी मिलिंद नार्वेकर यांना देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बरेच आमदार नार्वेकर यांनादेखील मानणारे आहेत त्यामुळे नार्वेकर यांची नक्की भूमिका काय राहिल? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. जी जबाबदारी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या तत्कालीन बंडाच्या वेळी सुनील तटकरे यांच्यावर सोपवली होती. तीच रणनीती उद्धव ठाकरे यांनी वापरली आहे.

बंड मागे नेमके कोण ?
एकनाथ शिंदे अंदाजे 30 आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले आहेत. हे जरी असले तरी बारकाईने विचार केला तर यातील बहुतांश आमदार हे मिलिंद नार्वेकर यांना मानणारे आहेत. त्यामुळे या बंड मागे नक्की कोण? आणि काय गणित आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडे जवाबदारी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सचिव मिलिंद नार्वेकर यांचे पंख छाटले गेले. उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्येक बैठकीत, सभेत दिसत असले तरी नार्वेकरं याना शिवसेनेत कुठलेही अधिकार उरलेला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नार्वेकर यांना लांब ठेवण्यात आले आहे.एकनाथ शिंदे यांच्या सर्व नाराजगी मागे नक्की कोण? याची शिवसेनेत चर्चा सुरू झाली आहे. यात जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत ते नक्की कुठल्या गटाचे आहेत, हे शिवसेना नेत्याना माहिती आहे. हे पाहता आमदारांना परत बोलावण्याची जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

हा शरद पवारांचा दबदबा !
राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी केलेलं बंडाच्या वेळी सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांची नाव चांगलीच गाजली. बंड होताच शरद पवार यांनी तातडीने सकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यात सर्वात आधी सुनील तटकरे यांना बोलवण्यात आले होते. सर्व आमदार परत आणण्याची जबाबदारी तटकरे यांच्याकडे देण्यात आली, दुपारी चार वाजेला धनंजय मुंडे यांना घेऊन तटकरे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ला हजर झाले. हा शरद पवार यांचा अससलेला दबदबा होता.

नार्वेकर यांची प्रतिष्ठा पणाला
शिवसेनेत आता हीच जबादारी मिलिंद नार्वेकर यांना दिली गेली आहे. शिवसेनेत कारवाई म्हणजे नक्की काय असते, याचा प्रत्यय गेल्या सहा महिन्यांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांना आला आहे. अशी चर्चा सेनेच्या अंतर्गत गटात दबक्या आवाजात सर्वाना माहिती आहे. जर हे आमदार परत आले नाहीत तर नार्वेकर यांचं सेनेत स्थान उरेल काय? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. हे पाहता नार्वेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिंदे यांना जय महाराष्ट्रचा निरोप देऊन नार्वेकर यांना सर्व आमदारांना परत आणावे लागणार आहे.