जनतेनेही प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करावे

0

शहादा तहसील कार्यालयात साहित्य वाटपावेळी आ.राजेश पाडवी यांचे आवाहन
शहादा/असलोद: कोरोना महामारीचे संकट अद्यापही टळलेले नाही. यापुढे अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. म्हणून कोरोनामध्ये काम करणार्‍या सर्व अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. जनतेनेही प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन करावे. आपण आपल्या परिवारासह आपला परिसर सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आ.राजेश पाडवी यांनी केले. शहादा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित साहित्य वाटपाप्रसंगी ते बोलत होते.
कोरोना योध्दांसाठी शहादा-तळोदा मतदारसंघातील आ.राजेश पाडवी यांनी स्थानिक आमदार निधीतून 30 लाखांचे पीपी किट, मास्क, सॅनिटायझर, हॅडग्लोज आदी वस्तूंचे वाटप शहादा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभाग, तालुका आरोग्य विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासन शहादा व म्हसावद यांना करण्यात आले.
यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पेंढारकर, मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी सी.टी.गोसावी, सभापती सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, आरोग्य सभापती वर्षा जव्हेरी, डॉ.किशोर पाटील, डॉ.वसंत पाटील, अजय शर्मा, विरसिंग पाडवी, अतुल जयस्वाल, जितेंद्र जमदाडे, दिनेश खंडेलवाल, सुनील चव्हाण, अविनाश मुसळदे, संजय कासोदेकर, राजेद्र जव्हेरी, लक्ष्मीकांत वसावे, योगेश पाटील , सचिन देवरे, विनोद जैन, पंकज सोनार, हितेंद्र वर्मा, नारायण ठाकरे, निलेश मराठे, नजमोदिन खाटीक, प्रशांत कुलकर्णी, अब्बास नुरानी, सिमा सोनगरे, कल्पना पंड्या, नंदा सोनवणे, अनामिका चौधरी, किन्नरी सोनार, भावना लोहार, रोहिणी भावसार, अक्षय अमृतकर, कमलेश जांगिड, अनिल पवार, सुरज ठाकरे, सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Copy