जनतेच्या सहभागातून अर्थसंकल्प

0

चाळीसगाव । चाळीसगाव नगरपालिका अधिकाधिक लोकाभिमुख होऊन चाळीसगावच्या विकासाची गती वाढावी म्हणून यावर्षीपासून चाळीसगाव नगरपालिकेने आगामी अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांच्या सूचना मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवर पदाधिकार्‍यांची बैठक नगरपालिकेत संपन्न झाली. नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी आगामी शहराच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात मिळालेल्या सूचनांचे पालन करत या संकल्पनांच्या अनुषंगाने बजेट मध्ये तरतूद करण्याच्या सूचना आमदार उन्मेशदादा पाटील यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करा – संभाजी सेना
चाळीसगाव । नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्यासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. एक कोटी रूपये तरतूद केल्याबाबत संभाजी सेना यांनी आभार व्यक्त करत सदरील निधी लवकरात लवकर मंजूर करून पुतळ्याचे काम मार्गी लावावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करावे, अशी मागणी संभाजीसेना यांनी नगरपालिका यांना देण्यात आले. एक कोटी रुपयांची तरतूदची निधी लवकरात लवकर पुतळा उभारण्यासाठी मंजुरी मिळविणे, त्याकरिता आपण नगरपालिकाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न करावा. कारण शिवरायांच्या पुतळ्यासाठी पैसा हा गौण आहे. प्रसंगी कीतीही कोटी रुपये लागले तरी तालुका व शहरातील शिवप्रेमी तो उभा करण्यास सक्षम आहेच आणि म्हणून लवकरात लवकर आपल्या स्तरावर मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. गेल्या अनेक वर्षांपासून शिवरायांच्या पुतळ्यासाठी जागा नियोजित केली गेली असून तिचे (जागेचे) कोणत्याही प्रकारे पावित्र्य राखले जात नसून तिथे कचरा टाकला जातो. म्हणून तिथे कायमस्वरूपी स्वच्छता राहील असा बंदोबस्त करावा. चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण न झाल्यास संभाजी सैनिक आंदोलन करतील याची नोंद घ्यावी. लक्ष्मण शिरसाठ, गिरीश पाटील, सुरेंद्र महाजन, विजय गवळी, अविनाश काकडे, सुरेश पाटील, बापू कुमावत, विजय देशमुख, दिवाकर महाले, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर पगारे, संदीप जाधव, सुरेश तिर्मली, आधार महाले यांची उपस्थिती होती.

बैठकीला यांची होती उपस्थिती
वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाठक, डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, संजय पवार, उद्योजक हिराशेठ बजाज, रोटरी क्लबचे संकीत छाजेड, मराठा सेवा संघाचे इंजि.साहेबराव पाटील, अंकुर साहित्य संघाचे शालीग्राम निकम, नगरपालिका गटनेते राजेंद्र चौधरी, विश्वास चव्हाण, नगरसेवक नितीन पाटील, घृष्णेश्वर पाटील, चंदुभाऊ तायडे, बापू अहिरे, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, विजयाताई पवार, आनंदजी खरात, विजयाताई पवार, व्यावसायिक संजय निंबाळकर, अ‍ॅड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, बापू चव्हाण, जितेंद्र वाघ, राजेंद्र पाटील, अभय वाघ यांची उपस्थितीत.