जनता एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स लांबवली

0

भुसावळ- महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी पर्स लांबवल्याची घटना अप जनता एक्स्प्रेसमध्ये 20 रोजी रात्री रावेरनजीक घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी नेहा अभिषेक गुप्ता (24, प्रेमनगर, गोरेगाव मुंबई) या 20 रोजी आपल्या सहकार्‍यांसोबत जनता एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 5 च्या 2, 3, 5, 6 बर्थ वरून पंडित दयानंद उपाध्याय जंक्शन (मुगलसराय) ते एलटीटी प्रवास करताना त्या झोपल्या असल्याची संधी साधून चोरट्यांनी रावेर स्थानकानजीक त्यांची पर्स लांबवली. पर्समध्ये मंगळसूत्र, चांदीचे तोरड्या मिळून 19 हजारांचा ऐवज तर 10 हजार 200 रुपये किंमतीचे तीन मोबाईल मिळून एकूण 29 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल होता. चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कॉन्स्टेबल अलका आढाळे करीत आहेत.

Copy