जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त रविवारी पालखी मिरवणूक

0

जळगाव : संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे रविवारी 8 रोजी पालखी सोहळा व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मिरवणूकीस स्वामी समर्थ मंदीर कांचन नगर येथून सुरुवात होणार असून चौघूले प्लॉट, शनिमंदिर, घाणेकर चौक, टॉवर चौक, महानगरपालिका 17 मजली इमारतीकडून गोविंदा स्टॉप, यश प्लाझा, एफ.सी.आय गोडाऊन, पिंप्राळा रोड येथे सांगता होणार आहे.

यावेळी तेली समाजाचे प्रतिक असलेला तेल काढण्याचा फिरता घाणा मिरवणूकीत मिरवविण्यात येणार आहे. तसेच पुण्यतिथी निमित्त महिलांसाठी कलश सजावट तर लहान मुलांसाठी विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीनंतर सायंकाळी भोजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवक मंडळातफर्ें करण्यात आला आहे.