Private Advt

जगद्गुरु तुकाराम महाराजांची जयंती साजरी

एरंडोल:-आज दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी मंगळवारी पाटील वाडा  येथे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे. जगातील प्रथम शेतकर्याची कर्जमाफी करणारे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस असणारे विद्रोही संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची ४१४ वी जयंती पाटील वाडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जयंती तिथी; वार :नक्षत्र यासारख्या कालबाह्य गोष्टी मध्ये अडकून दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जात असे .त्यामुळे त्यांचा अपमान होत होता. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय  युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हा तिथिचा घोळ  मिटावा व वारकरी संप्रदायाचा कळस असणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची जयंती सगळीकडे एकाच दिवशी साजरी व्हावी म्हणून 02 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली ‌
               यावेळी  प्रा. मनोज  पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, प्रा. शिवाजीराव अहिराराव . यांच्या हस्ते सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अहिरराव सर यांनी केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री मंगेश पाटील सुभाष पाटील अरुण पाटील ऋषिकेश पाटील आर डी पाटील प्रभाकर पाटील रमेश पाटील मनोज पाटील श्याम पाटील दत्तात्रय पाटील रतिलाल पाटील डॉ. प्रशांत पाटील गणेश भाऊ मराठे दत्तात्रय पाटील रामचंद्र पाटील किशोर पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी पंकज पाटील समाधान पाटील राकेश पाटील सर शरद पाटील प्रफुल पाटील राजू पाटील हेमंत पाटील विवेक पाटील गोटू पाटील शुभम पाटील हिमांशू पाटील पवन पाटील अमोल पाटील प्रशांत पाटील विनोद पाटील सचिन पाटील सतीश पाटील यांनी अनमोल सहकार्य केले