जगणं झाल महाग, मरण झाल स्वस्त !

0

किशोर पाटील, जळगाव: शहरासह तालुक्यात एक दिवसा आड, दोन जण आत्महत्या करत आहेत. यात नोव्हेंबर महिन्यातील अवघ्या 20 दिवसात 11 जणांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली आहे. यात काहींनी नैराश्यातून काही तर काहींनी ताणतणावातून, तर काहींनी व्यसनाना कंटाळून जीवन संपविले असल्याचे घटनांमध्ये विशेष म्हणजे यात आत्महत्या करणार्‍यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. तर काही घटनांमध्ये घरातील कर्त्या पुरूषाने आत्महत्या केल्याने त्यांचे पत्नीसह कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान आत्महत्यांच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले असू या जगण झाल महाग आणि मरण झाल स्वस्त अशा कवितेच्या ओळींचा प्रत्यय येतो. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पसरलेले तीव्र हताशीचे वातावरणही आत्महत्यांच्या वाढत्या घटनांना जबाबदार असल्याचे देतांना मनोविकार तज्ञ डॉ. नीरज देव यांनी बोलतांना
सांगितले.

शिरसोली येथे नैराश्यातून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
तालुक्यातील शिरसोली येथे आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी आकाशवाणी केंद्रामागील एका शेतात चिठ्ठी लिहून रवींद्र यशवंत उर्फ कडू वाघ (वय 40) याने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 9 वाजता उघडकीस आली आहे. त्याने चिठ्ठी लिहिली असून नैराश्यातून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

शिरसोली प्र.न.येथिल रवींद्र यशवंत उर्फ कडू वाघ (वय 40) हा काल 20 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या पासून घरातून बाहेर शौचास गेला होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली होती. आज सकाळी 9 वाजता शिरसोली प्र.न. गावालगत आकाशवाणी केंद्राच्या मागील गट न.608 भागवत ताडे यांच्या मालकीच्या शेतात बंटी गोपाल ताडे हा आलेला असता यावेळी त्याला विहिरीत रवींद्र वाघ हा तरंगताना दिसला. यावेळी बंटी याने सदर घटना शेतमालक भागवत ताडे याला सांगितले. शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. तात्काळ घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे राजेंद्र ठाकरे , निलेश भावसार दाखल झाले. रवींद्र वाघ यांच्या पश्चात पत्नी, 6 वर्षाचा दिपक हा मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

काय आहे सुसाईड नोट
मयत रवींद्र वाघ याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात म्हटले आहे की, दादा आई मला माफ करा. सुमीत्रा, दिपक बेटा आय लव्ह यु. मी तुमच्यावर फार प्रेम करतो. परंतु माझा पाय मला साथ देत नव्हता. मी हरलो. सर्वांची माफी मागतो आणि माझी जीवन यात्रा कट करतो. तुमचा सर्वांचा रवी. असे लिहिले आहे.

चोपड्याच्या तरुणीची जळगावात आत्महत्या
चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील 20 वर्षीय तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा पुनगाव येथील 20 वर्षीय कोमल अरुण बाविस्कर या तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप पाटील यांनी तिची तपासणी केली असता तिला मयत घोषित केले. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास सुनिल सोनार हे करीत आहे.

अशा आहेत 20 दिवसातील आत्महत्या घटना
1 नोव्हेंबर – जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील इंदिरा नगरातील दत्तू भानूदास मराठे वय 60 वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

9 नोव्हेंबर – जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे शासनालासह एटी महामंडळाला जबाबदार धरुन मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून मनोज अनिल चौधरी वय 31 या बस कंडक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

15 नोव्हेंबर – जळगा शहरातील वाघनगरात सुरज शंकर बागरे (वय 37) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

16 नोव्हेंबर- भादली बुद्रूक येथील कल्पेश चंद्रकात नारखेडे वय 24 तरुणाने धावत्या रेल्वेखाली झोकुन देत आत्महत्या केली.

16 नोव्हेंबर – जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे सख्या बहिण भावाने आई वडीलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाऊबीजेच्या घडली. या घटनेत बहिण अश्‍विता विजय कोळी वय 19 हिचा मृत्यू झाला होता.

18 नोव्हेंबर – जळगाव शहरातील कांचननगर येथे पत्नीच्या मृत्यूनंतर प्रमोद तुकाराम शेटे (32) रा.कांचन नगर यांनी असोदा रेल्वे गेटजवळ येऊन फेसबुक लाईव्ह केल्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली होती. 18 नोव्हेंबर – जळगाव शहरातील कांचन नगरात राहुल राजेंद्र जाधव (वय 21) या तरुणाने रात्री घरात कोणीही नसताना गळफास घेतला होता.

19 नोव्हेंबर – जळगाव तालुक्यातील कंडारी येथील विनोद भैय्यासाहेब सुर्वे वय 35 तरुणाची गळफास घेवून आत्महत्या केली होती.

19 नोव्हेंबर – जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील बांधकाम मजुर प्रदीप सदाशिव महाजन (वय-32) यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती.

21 नोव्हेंबर – शिरसोलीत नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

21 नोव्हेंबर – चोपडा तालुक्यातील पूनगाव येथील तरुणाची आत्महत्या

मनोविकारतज्ञ म्हणताहेत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला
आत्महत्येचा वाढत्या घटना, त्यात तरुणांचे प्रमाण अधिक यावर मनोविकार तज्ञ डॉ. नीरज देव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी अनेक महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. यात आत्महत्येची व्यक्तीशा कारणे भिन्न भिन्न असू शकतात. जेव्हा व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होते. तेव्हा त्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन जास्त असल्याची शक्यता असते. त्यामुळे ती आत्महत्येला प्रवृत्त होतात. कुठलही अपयश आल, किंवा आघात झाला की, तरी तो आपण सहजपणे सहन करत असतो. कधी कधी एखादा आघात झाला की, तो सहन करतांना, किंवा जुळवून घेतांना अवघड जात आपण त्यावर मात करतो. आपल्याला अस की वाटत की उद्याचा दिवस चांगल आहे, भविष्य चांगल आहे. पण ज्या लोकांमध्ये ही भावनाच लोप पावत असते, उद्या काहीच नाही अस ज्यांना वाटत, ते लोक आत्महत्येला प्रवृत्त होतात. हे एक कारण. ज्यांच्या व्यक्तित्वात तसेच मेंदुच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये बदल होतो. ते लोक आत्महत्येला प्रवृत्त होत असतात. ही मुख्य कारणे आहेत.

सध्याचा जर विचार केला तर कोरोना व लॉकडाऊन यामुळे तीव्र हताशीचे वातावरण पसरलेले आहे. तीव्र हताशीच्या तडाक्यात अनेक लोक सापडले. अनाठायी, अनावश्यक अपेक्षा वाढत चालल्या आहेत, स्पर्धा वाढत चालल्या आहेत. त्यामुळे कळत नकळत त्याचा परिणाम सहनशक्तीवर होतोय. या अपेक्षा व वाढलेली स्पर्धा याला जुळवून घ्यायला जेव्हा असमर्थ ठरतात. त्याचा परिणाम सहनशक्तीवर होतो. त्यामुळे मानसिकदृष्टया लवचिक असल पाहिजे, आहे त्या परिस्थितीला मी तोंड देईन, याची मनाची तयारी असली पाहिजे, वस्तूंपेक्षा, स्वतःला आणि स्वतच्या आवश्यकतेला, माणसाला जास्त किंमत दिली पाहिजे. स्वतःकडे, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर या घटना टळू शकतात, असे मनोविकारतज्ञ डॉ. नीरज देव यांनी बोलतांना सांगितले.