जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

भुसावळ । शहरातील जामनेवर रस्त्यावरील वाल्मिक नगर परिसरात 9 रोजी झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाने दुचाकीस धडक दिली असता यातील महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाल्याने कार चालकाविरुध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकलला कारने दिली धडक

प्रशांत ज्ञानदेव मिसाळ हे हिराबाई रामचंद्र कांबळे, (वय-70,रा. केशव नगर, भुसावळ) यांना आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच-19, 6335 वर बसवून बँकेत घेवून जात असताना शहरातील जामनेर रस्त्यावरील वाल्मिक नगरजवळ गतिरोधक आले असता मिसाळ यांनी वाहनाची गती कमी केल्याने फिर्यादी मागून येणार्‍या व्हॅगनर कार (एम.एच.02, एएल-588) वरील चालक विलास लोहार (रा. साकेगाव) यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.

डोके व पायास झाली होती दुखापत

यात हिराबाई कांबळे यांच्या पाय, डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना जखमीचा मृत्यू झाला. याबाबत कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर.ए. काझी करीत आहे.