जखमी घुबडाला जीवदान

0

इंदापूर : मांज्यात अडकून जखमी झालेल्या घुबडाला संतोष क्षिरसागर व उमेश क्षिरसागर या पक्षी मित्रांनी जीवदान दिले. इंदापूर शहरातील सातपुडा भागात राहणारे संतोष क्षिरसागर यांच्या घरा शेजारी 40 ते 50 फूट उंचीचे नारळाचे झाड आहे. या नारळाच्या झाडाला मांज्यामध्ये अडकून जखमी झालेले गव्हाणी जातीचे घुबड लटकत असल्याचे क्षिरसागर यांना दिसले. त्यांनी उमेश क्षिरसागर यांच्या मदतीने जीवाची परवा न करता या नारळाच्या झाडावर चढले. मांज्यामध्ये अडकलेल्या घुबडाची सुटका करून त्याला अलगद खाली आणले. घुबडाच्या पंखाला जखम झाल्याने त्याला उडता येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पक्षीमित्र डॉ. राजेंद्र साळुंखे यांना पाचारणा केली. डॉ. साळुंखे यांनी घुबडाची तपासणी करून ते गव्हाणी जातीचे घुबड असल्याचे सांगीतले. तसेच त्याच्यावर तात्काळ औषधोपचार करून त्याला वनविभाग हद्दीमध्ये सोडून देण्यात आले.