छत्तीसगड : चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक शहीद

0

मानपूर – छत्तीसगडमध्ये राजनांदगाव येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. मात्र या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्यामकिशोर शर्मा हे शहीद झाले. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मानपूर ठाणा क्षेत्रातील पारधोनी गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या चकमकीनंतर घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले, तसेच एक एके-४७ रायफल, एक एसएलआर रायफल, दोन ३१५-बोर रायफलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.