चौपाळे येथील ग्रामस्थांचा कृष्णापार्क रिसॉर्टवर हल्लाबोल

0

नंदुरबार। पाणी प्रश्नावरून चौपाळे येथील संतप्त ग्रामस्थांनी कृष्णा पार्क या रिसॉर्ट सेंटर हल्लाबोल करून प्रचंड नासधूस केल्याची घटना आज दुपारी घडली. घटनेनंतर सर्वच ग्रामस्थ तालुका पोलिस ठाण्यात येवून धडकले. पोलिसांनी ज्या ग्रामस्थांना पकडून आणले आहे त्यांना सोडा नाही तर संपूर्ण गावावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. विहीर बुजण्याची नोटीस बजावण्यात आल्याने ग्रामस्थांनी कृष्णा पार्क वर हल्लाबोल करून उध्वस्त केले आहे.