चौथ्या दिवसानंतर ग्रामीण रुग्णायातील सेवा सुरळीत

0

यावल । येथील ग्रामिण रूणालयातील कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरणी घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी संशयीत आरोपींना अटक केल्या नंतर येथे वैद्यकिय सेवेस सुरवात करण्यात आली आहे. तत्पुर्वी परिचारिका संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा पोलिस अधिकक्षकांची भेट घेवुन व्यथा मांडली होती व दुपारी काळ्या फिती लावुन काम सुरू करण्यात आले.

रुग्णांच्या नातेवाईकांनी केली होती मारहाण
येथील ग्रामिण रूग्णालयात वैद्यकिय अधिकारी नसल्याने अपघातातील जखमींच्या नातेवाईक, हितचितंकाच्या उद्रेकाचा बळी कर्मचारी ठरले होते 28 रोजी दुपारी घडलेल्या या प्रकारात दोन महिला व दोन पुरूष अशा चौघांना मारहाण झाली होती.

या पोलिसात गुन्हा दाखल असुन चार दिवस उलटुन ही आरोपींना अटक केली नाही व वैद्यकिय अधकारी देखील रूगणालयात देण्यात आले नाही म्हणुन शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य अधिपरिचारीका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा लष्करे, सचिव निशा चौधरी, सहसचिव रजनी बडगुजर, जयश्री वानखेडे, विकास धनगर, शंकर रेड्डी व कास्ट्राबाइट कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड सह स्थानिक सर्व आरोग्य कर्मचार्‍यांनी पदाधिकारी यांनी जळगावचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांना सोबत घेऊन पोलिस अधिक्षक डॉ. जालंधर सुपेकर यांची भेट घेतली व घटनेतील गांभीर्य सांगीतले व त्यांना निवेदन सादर केले.

20 मिनिटात आरोपी जेरबंद
पोलीस प्रशासनास वैद्यकिय अधिकार्‍यांनी निवेदन सादर करताच पोलिस अधिक्षक यांनी यावल पोलिस स्थानकात फोन करुन तेथील पोलिसांना धारेवर धरत आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले.

तसेच विनयभंग देखील या घटनेत झाल्याने त्या संबधीचे कलम या गुन्ह्यात वाढवण्याचे आदेयश दिले व अवघ्या वीसच मिनिटांत संशयीत आरोपी सिरात पिंजारी व राजु पिंजारी यास अटक करण्यात आली तर त्यानंतर दुपारी दिड वाजेला रूग्णालयात डॉ. शबाना तडवी व सर्व कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावुन कामकाजाला
सुरवात केली.