‘चौकीदार की दाढ़ी में तिनका’; राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर हल्ला

0

नवी दिल्ली- देशाचे चौकीदार चोर आहे अशा तिखट शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होते. दरम्यान आता पुन्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला केला आहे. राहुल गांधींनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना आणि आता देशाचे पंतप्रधान असतांना त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्ट्राचाराची माहिती देत टीका केली आहे.

लाइटस, कैमरा, स्कैम असे ट्विट करत राहुल गांधींनी टीका केली आहे.

पहिल्या सीन २००७ मध्ये मोदी गुजरातचे पंतप्रधान असतांना IL&FS कंपनीला ७० हजार कोटींचा प्रोजेक्ट गिफ्ट दिले. त्याचे आज पर्यंत काहीही काम झाले नाही.

दुसरा सिन २०१८ मोदी पंतप्रधान आहेत आता त्यांचा काळात ९१ हजार कोटींचा कर्ज बुडवून फरार झालेल्यांना बेलआउट मिळत आहे. यावरून “चौकीदार की दाढ़ी में तिनका” आहे अश्या शब्दात मोदींवर राहुल गांधींनी टीका केली.