चोरी तर केलीच जातांना एलईडी टीव्हीही फोडला

0

जळगाव: मुलीच्या भेटीसाठी इंदोर येथे गेलेल्या करण रसाल चव्हाण यांच्या (रामदेवबाबा टेकडी, समतानगर) येथील घरी चोरी झाल्याचे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातून त्यांच्या मिस्तरी कामाच्या दोन मशीन व ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लांबविला आहे. जातांना चोरटे घरातील महागडा एलईडी टीव्हीही फोडून गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस नाईक शिवाजी धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रत्ना मराठे करीत आहे. (सविस्तर लवकरच)