चोरी…चोरी…चुपके…दारु विक्री… पोलिस येताच माल सोडून पळाला

0

जळगाव- शहरात कडक लॉकडाऊनचे आदेश आहेत. या लॉकडाऊनचा फायदा उचलत सुप्रिम कॉलनी परिसरात चोरी चोरी चुपके दारु विक्री करणार्‍या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. छापा टाकण्यात गेलेल्या पोलीसांना पाहताच दारु विक्री करणारा आझाद कंजर आहे तो दारुचा माल जागेवर सोडून पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र अंधारात गल्ली बोळाचा फायदा घेत तो पसार झाला. कारवाईत पोलिसांनी 32 हजार 448 रुपयांचा देशी दारु बाटल्यांचे खोके असा माल जप्त केला आहे.

या पोलिसांच्या पथकाची कारवाई
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रामदेवबाबा मंदीराजवळ संशयित आरोपी आझाद बहादुर कंजर हा त्यांच्या घराच्या समोर बेकायदेशीर देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील, पोलीस नाईक नितीन पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र गायकवाड हे बुधवारी 9 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलीस येत असल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी आझाद कंजर हा पळून गेला. यावेळी त्यांच्या ताब्यातील सुमारे 32 हजार 448 रूपये किंमतीचे देशी टँगो पंच देशी दारूचे 13 खोके असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फरार संशयित आझाद कंजर यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सतिष गर्जे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Copy