चोरीप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

0

जळगाव : एमआयडीसी भागातील श्रीगणेश इंडस्ट्रीज येथे झालेल्या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी एकाला अटक केली असून त्याला आज शनिवारी न्या. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 9 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

4 ते 5 जानेवारी दरम्यानात श्रीगणेश इंडस्ट्रीज येथून अज्ञात चोरट्यांनी 24 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत कंपनीतील सुपरवायझर श्रीहरी तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी शुक्रवारी मोतीलाल चंद्रकांत तितरे वय-24 रा. साईनगर याला कंपनीकडे संशयितरित्या फिरतांना पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने गोविंद शेरसगि राजपूत यांच्या मदतीने चोरी केल्याच कबूली दिली. यातच आज शनिवारी संशयित मोतीलाल चंद्रकांत तितरे याला पोलीसांनी न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले. न्या. गोरे यांनी त्याला 9 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.