Private Advt

चोरवडजवळ दुचाकी अपघातात तिघे जखमी

भुसावळ : दुचाकीवरून ट्रीपल सीट जाताना अपघात घडल्यानंतर जखमी अवस्थेतील तिघांना तातडीने उपचारार्थ हलवून माजी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी माणुसकी धर्म जोपासला.

जखमींवर झाले तातडीने उपचार
तीनही जखमी हे मंगळवारी रात्री 10 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर येत असताना चोरवड गावाजवळ दुचाकीला अपघात घडला. त्याचवेळी जामनेरकडून भुसावळकडे माजी नगरसेवक पिंटू कोठारी येत होते व त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली व अन्य नागरीकांच्या मदतीने त्यांनी तिन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून हॉस्पीटलमध्ये रवाना केले. जखमींपैकी एकाला बंगाल येथे गावी जायचे असल्याने त्यास सोडण्यासाठी अन्य दोघे येत असल्याची माहिती मिळाली मात्र जखमींची नावे कळू शकली नाही.