चोरट्याकडून तीन मोटारसायकली केल्या हस्तगत 

0
जळगाव : एमआयडीसीतील अजिंठा-हाफकिन फार्मास्युटिकल्स कंपनीसमोरून 9 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुभाष मराठे यांचा मोबाइल चोरट्याने हिसकावून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना सोमवारी अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी चौकशी दरम्यान संशयितांकडून चोरी केलेल्या तीन मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
अजिंठा-हाफकिन फार्मास्युटिकल्स कंपनी समोरून 9 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुभाष मराठे यांचा मोबाइल चोरट्याने हिसकावून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी भूषण ऊर्फ पप्पू साहेबराव अहिरे (वय 24, रा. भडगाव), संजय गयाप्रसाद सागर (वय 27, रा. रामनगर, मेहरूण), रेहान बाबू चौधरी (वय 25, रा. अयोध्यानगर) यांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यांना मंगळवारी न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असतात त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. दिनेश बळीराम पवारा (वय 30, रा. खेडगाव, ता. एरंडोल) यांच्या मालकीची मोटारसायकल 3 डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी त्यांना ताब्यात देण्यासाठी अर्ज दिला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात संशयिताना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या मोटारसायकली केल्या हस्तगत…
एमआयडीसी पोलिसांनी भूषण ऊर्फ पप्पू साहेबराव अहिरे (वय 24, रा. भडगाव), संजय गयाप्रसाद सागर (वय 27, रा. रामनगर, मेहरूण), रेहान बाबू चौधरी (वय 25, रा. अयोध्यानगर) या संशयिताकडून तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यात एमएच-19-एजे-4481, एमएच-19-बीएफ-7639, एमएच-19-बीए-3807 या मोटारसायकलींचा समावेश आहे.