चोरट्यांचा मोर्चा शेत-शिवारात :  सहा शेतकर्‍यांचे विद्युत पंप फोडून तांब्यांची तार लांबवली

Six electric motor pumps were broken And Copper wires Extended from Tapi Area सावदा : तापी परीसरातील सुदगाव गावातून चोरांनी तब्बल सहा विद्युत मोटारपंप फोडून त्यातून तांब्याचे तार लांबवल्याने शेतकर्‍यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या बंदोबस्ताची मागणी
शेतकरी रघुनाथ लंके, पांडुरंग जनार्दन, विश्वास तायडे, हेमंत सरपटे, गोकुळ कोळी व पांडूरंग पाटील या शेतकर्‍यांच्या इलेक्ट्रीक पंपातून चोरट्यांनी तांब्याची तार लांबवली. चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलिसात तक्रारी केल्यानंतर चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.