चोरट्यांचा मोर्चा मंदिराकडे : पितळी घंटा चोरताना ग्रामस्थांची धाव, चोरटे पसार

Attempt to steal brass bell from Saptshringi Devi temple: Crime against two people from Mahelkhedi यावल : भुसावळ रस्त्यावरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात महेलखेडी येथील दोन जणांनी येऊन घंटा चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार शेतकर्‍यांच्या निदर्शनास येतात भामट्यांनी पळ काढला. यावल पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांचा मोर्चा मंदिरांकडे
शहातील भुसावळ रस्त्यावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून संशयीत गणेश संदीप न्हावकर व निलेश सोपान तायडे (दोघे रा.महेलखेडी, ता.यावल) यांनी पितळी घंटा स्क्रू ड्रायव्हर व्दारे तसेच पान्ह्याद्वारे घंट्याचे नट बोल्ट खोलून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार राजेश कमलाकर करांडे यांच्या निदर्शनास आला व त्यांना पाहून संशयीत पसार झाले मात्र राजेश करांडे यांनी पोलिसात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र पाटील करीत आहे.