चोपड्यात स्वरनंदवन कार्यक्रमाचे आयोजन

0

चोपडा – आनंनदवनातील व्यिांग व कुष्ठरोगी बंधूच्या 150 कलावांनी मिळून तयार केले स्वरानंदवन हा आर्केस्ट्रा शनिवार 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित केला असून या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, पालक, बंधू व भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आमटे यांनी आनंदवनातील दिव्यांग बांधवांना सोबत घेवून अंध, अपंग, कुष्ठरोगी बांधवांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाची आर्केस्ट्रा रूपात उभारणी केली आहे. 150 कलावंतांना या कार्यक्रमात भाग घेतात सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. नागरीक बंधून भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आर.डी.पाटील, सागर तायडे, ललीत याज्ञिक व समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.