चोपड्यात भूगोल सप्ताह उत्साहात साजरा

0

चोपडा । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे ‘भूगोल सप्ताह’ साजरा करण्यात आला. 14 जानेवारी संपूर्ण भारतभर भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने 9 जानेवारी रेाजी भौगोलिक सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. महाविद्यालयातील एकूण 550 विद्यार्थी या परीक्षला प्रविष्ट झालेले होते.16 जानेवारी रोजी भौगोलिक पोस्टर स्पर्धेत सहभाग नोंदवून पर्यावरणीय समस्या व संवर्धन विषयावर उत्कृष्ट पोस्टर सादर केले.

मान्यवरांकडून विविध विषयांवर केली चर्चा
यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.एम.बी.चव्हाण यांचे भूगोल विषयाचे जीवनातील स्थान या विषयावर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केलेले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.ए.एल.चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेश जी.पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, प्रा.डॉ.एम.बी.चव्हाण, प्रा.आशा पोतदार, उपप्राचार्य एम.बी.हांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा.एन.एस.कोल्हे यांनी केले. स्वागतगीत वर्षा जगताप हिने म्हटले. विविध स्पर्धामधील विजेत्यांची घोषणा प्रा.मुकेश पाटील यांनी केली. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिस देवून सत्कार करण्यात आला.