चोपडा सेतू सुविधा केंद्राचा ऑनलाइन भ्रष्टाचार

0

चोपडा । येथील तहसील कार्यलायवर सुरु असलेल्या सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाइन केले जाणार्‍या कागदपत्रामध्ये ग्राहकाच्या बारकोड मध्येच लाखो रुपयांचा भ्रष्टचार होत असल्याची माहिती कागदपत्रांच्या पुराव्यासह पत्रकार परिषदेत बाजार समिती संचालक धनंजय पाटील,भाजपचे माजी शहराध्यक्ष रवींद्र बडगुजर यांनी दिली आहे. धनंजय पाटील यांनी स्वत 6 मे रोजी तहसील कार्यलयावरील सेतू सुविधा केंद्रावर तीन वेगवेगळे प्रतिज्ञापत्र केले.त्यात जन्म तारिखे बाबतचे बारकोड सह प्रतिज्ञा पत्र खरे होते, तर विवाह नोंदणी आणि रेशन कार्ड हरविणे बाबतचे दोन प्रतिज्ञापत्रवर ऑनलाइन बारकोड क्र हा चुकीचा असून ते बारकोड महाराष्ट्रातील अन्य लोकांचे नावाने प्रिंट झाले आहेत.त्या प्रतिज्ञापत्रचे बारकोड नाही हे दर्शवते.

हजारो ग्राहकांची होते फसवणूक
या सेतू सुविधा केंद्रवर दररोज शेकडो ग्राहकाचे कागदपत्रांवर प्रतिज्ञापत्र मध्ये वरील प्रमाणे फसवणूक झाल्याचे समजून आले आहे.त्या बाबतचे 27 लोकांचे कागदपत्राची ऑनलाइन पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. त्यात धनंजय पाटील, यांनी सांगितले की,अश्या अनेक प्रकरणामध्ये ग्राहकाकडून घेतली जाणारी फी हि शासन दरबारी न जमा होता,ती सेतू सुविधा केंद्रात घशात जात असून त्याला चोपडा तहसील कार्यलयाचा अधिकाऱयांच्या आशीर्वदाने सुरु असून त्यात त्याची मिलीभगत असल्याशिवाय हे सुरु राहू शकत नाही.

जनतेची आर्थिक लूट थांबविण्याची मागणी एखाद्या माणसाची त्याने केलेल्या प्रतिज्ञा पत्र ची कायदेशिर पडताळणी झालीच तर त्याचावर खोटे प्रतिज्ञा पत्र केले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो. तेव्हा या गोष्टीला सेतू चालक व शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, तसेच या प्रकरणाची निदोष चौकशी होणे करता येथील अधिकार्‍यांची ताबडतोब बदली करून चौकशी करावी, जेणेकरून शासनाची फसवणूक व लूट करणारा व्यक्ती किव्हा अधिकारी यातून सुटणार नाही. या ऑनलाइन भष्ट्रचाराची व्याप्ती महाराष्ट्रभर असण्याची शक्यता असू शकते. तरीयाबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब लक्ष घालून भष्ट्रचार करणार्‍याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी व शासन व जनतेची आर्थिक लूट व फसवणूक थांबविली गेली पाहिजे अशी मागणी केली आहे.

माहिती खोटी आढळल्यास गुन्हे
नव्याने व यापूर्वी केलेल्या ऑनलाइन प्रतिज्ञापत्र धारकाने सेतू सुविधा केंद्राची महा ऑनलाइन.गोव्हरमेन्ट.इन या वेब साईटवर महा ऑनलाइन एलटीडी वर क्लिक करून आपली सत्य प्रत प्रस्थापित करा. या मध्ये आपला बारकोड टाकून सत्य प्रत वर आपण केलेले प्रतिज्ञापत्रची किव्हा संमती पत्राची माहिती पडताळून पाहता येईल.हे प्रतिज्ञापत्र किव्हा संमती पत्र खोटे आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती धनंजय पाटील, रवींद्र बडगुजर यांनी दिली.