चोपडा शहर ऑनर किलिंगने हादरले : तरुणीची गळा दाबून तर तरुणाची गोळी झाडून हत्या

Honor killing shakes Chopra: Murder of young man and woman : Murder by strangulation and shooting चोपडा : तरुणीचा गळा आवळून तर तरुणाचा गोळी झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चोपडा शहरातील वैजापूर रस्त्यावर घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ऑनर किलिंग प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

खुनानंतर अल्पवयीन संशयीताने दिली माहिती
समजलेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिसात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलाने दोघांचा खून केल्याची माहिती देत पिस्टलही पोलिसांपुढे हजर केल्याने पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी तरुणाच्या माहितीची खात्री केल्यानंतर चोपडालगत जुना वराड रोड शिवारात नाल्यात दोघांचे मृतदेह आढळले तर तरुणीचा गळा आवळून तर तरुणाचा गोळी झाडून खून झाल्याची बाब समोर येताच शहरात मोठी खळबळ उडाली.

यांचा झाला खून
पोलिसांनी दोन संशयीत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घतले असून दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेत वर्षा समाधान कोळी (20, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (22, रा.रामपूर, चोपडा) यांचा मृत्यू झाला. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक रावले करीत आहेत.