चोपडा शहरात पाईप लाईनमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी

0

चोपडा । मु ख्य शहरात गेलेल्या पाण्याची पाईप लाईनमधुन आज 6 मार्च रोजी दुपारी 3ते 4 तास हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. या पाण्याची होणारी नासाडीकडे चोपडा नगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे शहरात दिवसभर चर्चा होती. बजरंग नगर जवळ असलेल्या पाण्याची टाकी नगर परिषदेने उभारली आहे या टाकीतुन कॉलनी परिसरासह शहरातील काही भागात देखील पाणी पुरवठा सोडण्यात आला. आज दुपारी 11 ते 3 वाजे दरम्यान पाणीपुरवठा सोडण्यात आला होता. ही पाईप लाईन रत्नावती नदिवरील पुलाला लागुन गेली आहे. परंतु याच ठिकाणी अनेकवेळा पाण्याची नासाडी होताना दिसुन येत आहे. तरी देखील नगर परिषदेने याकडे जातीने लक्ष दिले नसल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असते.

पाण्याचा मोठ्या प्रमाणावर दाब असल्यामुळे हवेतच येतात फवारे
पाईपाच्या ज्याठिकाणी पाण्याच्या व्हॉलमधुन पाणी अक्षरशः 7 ते 8 फुटाप्रर्यंत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर दाब असल्यामुळे हवेतच पाण्याचे फवारे उडत होते. चोपडा शहरात कॉलनीच्या परीसरात 5 ते 7 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असते. तसेच घरात पाणी वापरण्यासाठी साठवणुक करून ठेवावे लागत असुन उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे आता पाण्याचा वापर वाढताना दिसुन येत आहे.
शासन एकीकडे पाणी जपुन वापण्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करतात मात्र चोपडा शहरात हजारो लिटर पाण्याची नासाडी होते असते. त्यामुळे नगर परिषदेच्या नियोजन किती योग्य रित्या आहे हे दिसुन येत आहे. या निमित्ताने हे जिवंत उदाहरण आहे. या ठिकाणी पाण्याची नासाडी होताना हि पहिलीच वेळ नसुन याआधी देखील अनेकवेळा पाण्याची नासाडी होताना दिसुन आले आहे.

नगर पालिकेचे दुर्लक्ष
पाण्याचा विषय किती गंभीर असुन राज्यात काही भागामंध्ये टॅकरने पाणी पुरवठा केला जात असतो. परंतु चोपडा शहराला तापी नदीवरुन पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे उन्हाळ्यासाठी किती महिने अथवा किती दिवस पाणी साठा तापी नदीच्या पाञात उपलब्ध आहे का? याची माहिती मुख्याधिकारी यांनी घेतलेली दिसुन येत नसल्याचे यांची उदासीनता दिसुन येत आहे, अशी चर्चा शहरात होती.