Private Advt

चोपडा शहरातून तेरा वर्षीय मुलाचे अपहरण

चोपडा : चोपडा शहरातील फुले नगर भागातून 13 वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
चोपडा शहरातील फुले नगर भागात रुपेश उर्फ भुर्‍या अमृत माळी (13) हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 16 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रुपेश याला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. याबाबत मुलाची आई कल्पना अमृत माळी यांनी तातडीने चोपडा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अनत व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.