चोपडा येथे हुतात्मा कन्हैय्या बंधू स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

0

चोपडा । तालुक्यात शिवसेना उदयास आणणारे व शिवसेनेसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारे कै.वीर हुतात्मा कन्हैय्या बंधूच्या 31 स्मृतिदिनानिमित्त शिवाजी चौकात शिवसेना युवासेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. कै.वीर हुतात्मा बाळासाहेब कनैय्या, कै. वीर हुतात्मा मुरलीधर कनैय्या बंधू यांच्या छायाचित्राला शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

अभिवादन कार्यक्रमात यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आ. कैलास पाटील कृउबा उपसभापती नंदकिशोर पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक दिपकसिंग जोहरी, नगरसेवक किशोर चौधरी, महेश पवार, राजाराम पाटील, महेंद्र धनगर, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, आबा देशमुख, संजय पोतदार, अमृतराव सचदेव, सुनील बडगुजर, बाळू आबा, पप्पु सोनार, सुनील बर्डिया, सुभाष शिंपी, महेंद्र भोई, मधुकर कनैय्या, शशी कनैय्या, माजी तालुका प्रमुख अशोक पाटील, देवेंद्र सोनवणे, पंकज चौधरी, नितीन पाटील, बबलू पालीवाल, चंद्रकांत महाजन, जितेंद्र पाटील,विलास गायकवाड, मुकुंदा गायकवाड, कमलेश बडगुजर, रावसाहेब पाटील, भैय्या कनैय्या, नरेश महाजन, दीपक चौधरी, नितीन चौधरी यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिकानीं उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी कनैय्या बंधू प्रतिष्ठानतर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वेले येथील अनाथालय व बालकाश्रमात अन्न दानाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.