चोपडा येथे प्रवासी वाढवा अभियानास प्रारंभ

0

चोपडा । येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चोपडा आगारात प्रवासी वाढवा अभियानाचा नुतन वर्षाच्या निमित्ताने प्रारंभ प्रवासी संघटनेचे पदाधिकारी अनिल पालिवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी चोपडा आगाराचे पालक अधिकारी टी.पी.पाटील, आगार व्यवस्थापक एन.बी.गावीत, व्ही.एल.भालेराव, मंचावर हजर होते. प्रास्तविक भगवान न्हायदे यांनी केले. यावेळी पालक अधिकारी पाटील यांनी चालक,वाहक व कर्मचार्‍यांनी सुरक्षीत व दर्जेदार सेवा प्रवाश्यांना देवून जास्तीतजास्त प्रवाशी एस.टी.कडे कसे आकर्षीत होतील. याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. तसेच महामंडळाने आगारासाठी जाहिर केलेल्या बक्षीसाची रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आगारात व्यवस्थापक म्हणून नव्याने रूजू झालेले गावित यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी कर्मचारी संघटनेचे पंडित बाविस्कर, डी.एस.देवराज, सतिष सोनार, के.एस.सोनवणे, मधुसुदन बाविस्कर, संजय लोहार, अनिल बाविस्कर, आर.बी.शेख आदि उपस्थित होते.