चोपडा येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

0

‘खुशनुमा जीवन-जीवन जीने की कला’वर करणार मार्गदर्शन
चोपडा – मानवी जीवनातील ताणतणाव, स्व-व्यवस्थापन, सकारात्मक व सहकारात्मक जीवनशैली, मेडिसीन अँड मेडिटेशन या विषयावर जगभर मार्गदर्शन करणाऱ्या विश्वविख्यात तेजस्वी वक्त्या राजयोगिनी ब्रम्हकुमारी उषा दीदीजी ‘खुशनुमा जीवन-जीवन जीने की कला’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १४ ऑक्टोबर, रविवार रोजी प्रभू चिंतन भवन, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्र, यावल रोड, चोपडा येथे सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन चोपडा येथील ब्रम्हकुमारी परिवारातर्फे करण्यात आले आहे. यावेळी क्षेत्रीय निर्देशिका ब्रम्हकुमारी मीनाक्षी दीदी (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी ध्यानकक्ष ‘बाबा का कमरा’चे उद्घाटन ब्रम्हकुमारी उषा दीदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील धर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणाला नुकतेच १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित द्वितीय विश्व हिंदू काँग्रेसला ब्रम्हकुमारी उषा दीदी यांनी शिकागो येथे संबोधले असून दूरचित्रवाणी वरील विविध वाहिन्यांवरुन त्या समाजाला मार्गदर्शन करत असतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात विधी मंडळ सदस्यांना त्यांनी संबोधित केले होते. १९८० पासून जगभर राजयोगाचा प्रसार करणाऱ्या ब्र कु उषा दीदी या रामायण, महाभारत अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. त्यांच्या या उद्बोधनाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा केंद्राच्या संचालिका ब्र कु मंगला दीदी यांनी केले आहे. याप्रसंगी राज दीदी, सारिका दीदी, संगीता दीदी (अडावद) यांच्यासह राजेश शर्मा, सुरेश अग्रवाल, के.डी.चौधरी, पत्रकार संजय बारी, जितेंद्र शिंपी, गौरव महाले, एम.डब्ल्यू.पाटील, प्रफुल्ल गुजराथी, आदेश जैन, शांतारामभाई, राजू अण्णा, जयवंतभाई, विजयभाई हे उपस्थित होते.

Copy