चोपडा येथे एस.आय.पी.पतसंस्थेची सभा उत्साहात

0

चोपडा । येथील इंदिराताई पाटील सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गिरिराज लॅान्सवर चेअरमन इंदिराताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व श्री लक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पतपेढीच्या आर्थिक पत्रकांसह अहवाल वाचन मॅनेजर दिपक पाटील यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी जिल्हा गुर्जर संस्थानवर निवड झालेबद्दल जिल्हा बँकेचे शाखाधिकारी डी.बी.पाटील, संस्थेचे संचालक दिपक भानूदास पाटील यांचा व्यापारी महामंडळावर निवड झाल्याबद्दल पतपेढीचे व्हा.चेअरमन श्रीकांत नेवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक भानूदास पाटील, नंदकिशोर पाटील, छाया पाटील, चोपडा सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे व सभासद मोठ्या संख्येने हजर होते. आभार इंदिराताई पाटील यांनी मानले.

Copy