चोपडा येथील विद्यार्थ्यांनी अनुभवला फिरता तारांगण शो

0

चोपडा । येथील विवेकानंद विद्यालयात आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विज्ञान बोधवाहिनी, मुंबई आयोजित तारांगण शो विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. 1992 पासून सतत पूर्ण वेळ कार्यरत राहून भास्कर सदाकडे (तासगाव), यांच्यासह गणेश वायदंडे, महेश सदाकडे हे विद्यार्थ्यांपर्यंत तारांगण शाळांचे आयोजन करून शोचा अनुभव पहावयास मिळत आहे. जळगाव जिल्हा तारांगण संयोज डॉ. आयुब पिंजारी यांच्या प्रयत्नांतून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत पोहचते. या सोबतच भास्कर सदाकडे यांनी आतापर्यंत 300 बुवा -बांबा यांचा भांडाफोड व 175 स्त्रियांचे जटा निर्मुलन त्यांनी केले आहे.

तारांगण शोचे उद्घाटन: विद्यालयातील या तारांगण शो चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, माजी अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अ‍ॅड. रविंद्र जैन, विश्वस्त मंगला जोशी, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ, जेनिफर मथायस, योगीता केंगे, संजय सोनवणे, अनिल शिंपी यांच्या उपस्थित करण्यात आला. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन राधेश्याम पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय पाटील, सरला शिंदे, नुतन अत्तरदे, राजेश्वरी भालेराव, राकेश विसपुते, नरेंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले.