चोपडा बस आगारात मराठी दिन उत्साहात

0

चोपडा । येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात राजभाषा दिन व कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या औचित्य साधून नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नगरसेवक जीवन चौधरी, कैलास सोनवणे, प्रा.के.एन.सोनवणे, राधेश्याम पाटील, पालक अधिकारी टी.पी.पाटील, आगार व्यवस्थापक निलेश गावित, भारती बागले उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना, प्रवाश्यांना मराठी साहित्यिकांची प्रवास वर्णनाची पुस्तके भेट देवून वाचन परंपरेला हातभार लावण्यात आला. यावेळी राधेश्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक प्रभाकर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार संघटनेचे सचिव पंडित बाविस्कर, के.एस.सपकाळे, श्याम घामोळे, कुंदन बोरसे, भगवान न्हायदे, संदीप पाटील, के.ए.सोनवणे, एस.ए.पठाण, सुनिल सोनवणे, गुरुदास पाटील, सतिष सोनार आदींनी परिश्रम घेतले.