चोपडा प्राथमिक उर्दू शाळा नवीन इमारतीचे भूमिपुजन

0

चोपडा । येथील नॅशनल सोशल वेलफेअर सोसायटी संचलित नॅशनल प्रायमरी उर्दु स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी मंत्री नवाब मलिक आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरूणभाई गुजराथी यांच्या हस्ते इमारतीचे भुमिपूजन करण्यात आले. मुस्लीम समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे हे देशात सर्वच जबाबदारी नागरिकांना वाटते. देशाच्या विभागणीनंतर सुशिक्षित व उच्च पदस्थ मुस्लिम समाज पाकिस्तान व बांगलादेशात स्थलांतरित झाला. त्यामुळे शिक्षणापासून वंचीत समाज भारतात राहिला. शिक्षण घेवूनही समाजात नोकर्‍या मिळत नसल्याचे चित्र आहे. मुस्लिम समाज शिक्षणापासून दुरावला असल्याचे प्रतिपादन नवाब मलिक याने केले. ते इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी नगराध्यक्ष मनिषा चौधरी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, माजी आमदार जगदीश वळवी, कैलास पाटील, डॉ.सुरेश पाटील, घनशाम अग्रवाल, हाजी सत्तार मिस्तरी, हाजी करिम सालार, गफ्फार मलिक, नुरोद्दीन नाईक, हाजी नौमान, चंद्रहास गुजराथी, प्रविण गुजराथी, निता पाटील, जीवन चौधरी, जगन्नाथ पाटील, प्रा. शांतीलाल बोथरा, आत्माराम म्हाळके, डॉ. सुरेश बोरोले, पी.बी. पाटील, इंदिराताई पाटील, संजय जैन, असगर अली सैय्यद, अकिलोद्दीन जहागिरदार, रऊफ बागवान, आसिफ सैय्यद, हाजी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक शे. सलीम शे.मासूम यांनी केले. सूत्रसंचालन रईस सीतारा व उमर काझी मालेगाव यांनी तर आभार अजिम यांनी मानले.