चोपडा उपनगराध्यपदासाठी आघाडीत हालचालींना वेग

0

चोपडा – शहर विकास आघाडीने 17 जागा जिंकून नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मनिषा चौधारी यांना जनतेने थेट निवडून दिले असले तरी उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीत हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षीय बलाबल पाहता आघाडीच्या 17 जागा असून शिवसेना 9, अपक्ष 3 असे 29 नगरसेवक व थेट नगराध्यक्ष म्हणून मनिषा चौधरी निवडून आल्या आहेत. 17 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे भुपेंद्र गुजराथी व हितेंद्र देशमुख यांच्या व्यतिरीर्कत भाजपाचे तीन नगरसेवक वार्ड क्र. 14 मधून निवडून आले आहे. या उमेदवारात नारायण पंडीत बोरोले आग्रस्थानी आहेत.

नारायण बोरोले माजी नगरसेवक असून त्यांना नगरपालिका प्रशासनाचा ऊनभव आहेत. नारायण बोरोले यांच्यामुळे उर्वरित दोन जागा आघाडीला जास्त मिळाल्या असून आघाडीने पहिल्या उपनगराध्यक्ष म्हणून श्री. बोरोले यांच्या नावावर एकमत करावे अशी मागणी शहरात जोर धरू लागली आहे. काँग्रेस व भाजप प्रणित उमेदवारच आघाडीत उपनगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत. असा सुर आघाडीतील दोन्ही पक्षांकडून निघत आहे.