चोखावाला लिटल अकॅडमीत वार्षिक स्नेहसंमेलन

0

नवापूर : दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित चोखावाला लिटल एन्जेल्स अकॅडमीत इंग्रजी माध्यम शाळेत वार्षिक स्नेहसमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला तर प्रमुख अतिथी जि. प. अध्यक्षा रजनी नाईक, तहसीलदार प्रमोद वसावे, तसेच पोलीस उपनिरीक्षक दिलीप बुवा, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, शिरीषभाई शाह, जितेंद्र देसाई, संचालक फकीरभाई अग्रवाल ,धीरूभाई प्रजापत ,राजेंद्र अग्रवाल, शीतलबेन वाणी , मोहम्मद मुल्ला आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा रजनी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील लोकप्रिय नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सिमरन दिवटे यांनी केले. सूत्रसंचालन मंजुषा वसावे, लुबना पटेल, आकांक्षा मगावकर तर आभार प्राजक्ता लाड यांनी मानले यांनी केले. यशस्वितेसाठी शोएब मांदा, जयेश अग्रवाल, बबनराव जगदाळे, अतिक सैय्यद व शिक्षकवृंद व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.