चैनीसाठी त्याने चोरली तब्बल 33 दुचाकी वाहने

0

महाविद्यालयीन पार्किंगवर ठेवायचा लक्ष

पिंपरी-चिंचवड : शहरातील महाविद्यालयीन पार्किंगमधील वाहनांची टेळहणी करुन चावी असणार्‍या टू व्हीलर चोरीचा त्यांचा धंदा बनला होता. मात्र, स्वतःची चैन आणि मौजमजेसाठी गाड्या चोरीचा त्यांचा व्यवसाय झाला होता. त्या चोरलेल्या वाहनाची त्याने विक्री करताना संबंधित चोरट्यास भोसरी पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 33 चोरीचे वाहने हस्तगत करण्यात आली आहे. सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भोसरीत रचला सापळा

चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले.

आरोपी शिक्षीत

आरोपी सुभाष हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याने बी कॉमचे शिक्षण घेतले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने वाहन चोरी करून पैसे कमावण्याचा मार्ग स्वीकारला होता. मागील तीन वर्षांपासून तो वाहन चोरत होता. शाळा महाविद्यालयांच्या बाहेर ज्या मोपेड दुचाकीची चावी चालक विसरला आहे, अशीच मोपेड दुचाकी तो चोरत असे. पोलिसांनी त्याच्याकडून 16 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमध्ये डेक्कन पोलीस ठाण्यातील दहा, भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, पिंपरी चार, विमानतळ तीन, शिवाजीनगर तीन, कोरेगाव पार्क दोन, एमआयडीसी भोसरी, दिघी, भारती विद्यापीठ, विश्रामबाग, विश्रांतवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 33 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

यांनी केली कारवाई

वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर, फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Copy