Private Advt

चेट्रीचंड उत्सवानिमित्त भुसावळात शोभायात्रा जल्लोषात

भुसावळ : चेट्रीचंड्र उत्सवानिमित्त शहरातील सिंधी कॉलनीतील श्री भगवान झुलेलाल मंदिरापासून शनिवारी दुपारी 12 वाजता शोभा-यात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत सजवलेल्या रथावर श्री झुलेलाल भगवान यांची प्रतिमा, बेहराणा साहेबांची मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत युवतींचे लेझीम पथक, नृत्य पथक, उल्हासनगर येथील प्रसिद्ध शहनाई, ढोल-ताशा पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदिर, नृसिंह मंदिर, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मी चौक, सराफ बाजार या मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीचा रात्री मॉडर्न रोडवर समारोप झाला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली.

शोभायात्रेने वेधले लक्ष
भगवान श्री झुलेलाल जयंतीनिमित्त आयोजित चंट्रीचंड्र उत्सवाला दोन वर्षांपासून कोरोनामुळे ब्रेक लागला होता मात्र यंदा नियम शिथिल झाल्याने जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी दुपारी 12 वाजता निघालेल्या शोभायात्रेचा मॉडर्न रोडवर रात्री 8.30 वाजता समारोप झाला. तत्पूर्वी, सिंधी कॉलनी, जामनेर रोड अष्टभुजा देवी मंदिर, नृसिंह मंदिर, मुख्य बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक निघाली. रात्री तापी नदीवर बहेराणा साहेब यांचे विसर्जन झाले. मिरवणुकीवर पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी आतषबाजी झाली. सच्चोसतराम चौक, छोटा सेवा मंडळ, जामनेर रोड आदी ठिकाणी थंड पाणी व प्रसाद वितरण झाले. शोभायात्रेत युवती, महिलांचे लेझीम पथक, नृत्य पथक, ढोल ताशा पथक लक्षवेधी ठरले.

यांची होती उपस्थिती
भगवान झुलेलाल मंदिरात सकाळी महापूजा झाली. पुजारी मुरलीधर श्रृंगी यांनी ही महापूजा केली. नंदलाल मनवाणी, राजा बजाज, नारायण छाबडीया, मनोहर सोडाई, सुरेंद्र वासवानी, अ‍ॅड. मनीष सेवलानी, माजी नगरसेवक रमेश नागराणी, माजी नगरसेविका पुष्पा बतरा, प्रकाश बतरा, अजय माखिजा, जितू माखीजा, गोपाळ कमनानी आदी उपस्थित होते. दुपारी महाआरती व महाप्रसाद वितरणानंतर शोभायात्रा निघाली.

मिरवणूक मार्गावर फराळ वितरण, फटाक्यांची आतषबाजी
जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी 12 वाजता निघालेल्या शोभायात्रेचा मॉडर्न रोडवर रात्री 8.30 वाजता समारोप झाला. तत्पूर्वी, सिंधी कॉलनी, जामनेर रोड अष्टभुजा देवी मंदिर, नृसिंह मंदिर, मुख्य बाजारपेठ या मार्गाने मिरवणूक निघाली. रात्री तापी नदीवर बहेराणा साहेब यांचे विसर्जन झाले. मिरवणुकीवर पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी आतषबाजी झाली. सच्चोसतराम चौक, छोटा सेवा मंडळ, जामनेर रोड आदी ठिकाणी थंड पाणी व प्रसाद वितरण झाले. शोभायात्रेत युवती, महिलांचे लेझीम पथक, नृत्य पथक, ढोल ताशा पथक लक्षवेधी ठरले. भगवान झुलेलाल मंदिरात सकाळी महापूजा झाली. पुजारी मुरलीधर श्रृंगी यांनी ही महापूजा केली. नंदलाल मनवाणी, राजा बजाज, नारायण छाबडीया, मनोहर सोडाई, सुरेंद्र वासवानी, अ‍ॅड. मनीष सेवलानी, माजी नगरसेवक रमेश नागराणी, माजी नगरसेविका पुष्पा बतरा, प्रकाश बतरा, अजय माखिजा, जितू माखीजा, गोपाळ कमनानी आदी उपस्थित होते. दुपारी महाआरती व महाप्रसाद वितरणानंतर शोभायात्रा निघाली.