चॅम्पियन चषकाचा राजदूत झाला ‘भज्जी’

0

दुबई । भारतीय संघाचा वरिष्ठ खेळाडू व दिग्गंज स्पिनर हरभजन सिंहला 1 ते 8 या काळात होणार्‍या इंग्लंडमधील आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धेसाठी राजदूत म्हणून निवड झाली आहे.त्याच्यासोबत अजून 7 राजदूत राहणार आहे.असे एकुण 8 राजदूतांची निवड करण्यात आली आहे.भारताच्या हरभजन सिंह सोबत पाकिस्तानचा शाहित अफ्रीदी, बांगलादेशचा हबीबुल बशर, इंग्लंडचा इयान बेल, न्युजीलंडचा शेन बॉड, ऑस्ट्रेलियाचा माइक हस्सी, श्रीलंकेचा के.कुमार संगकारा, आणि दक्षिण अफ्रिकेचा ग्रीम स्मिथ यांची राजदूत निवड करण्यात आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 50 दिवस आधी सदिच्छादूतांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेशमध्ये ओव्हलच्या मैदानात होणार आहे.हरभजन सिंह हा भारतीय संघाचा 2002चा सदस्य होता त्यावेळी भारताल श्रीलेकाला चषक भागीदारीत मिळाला होता.यामुळे त्याला याचा अभिमान आहे. आयसीसी दिलेल्या महितीवरून हरभजन सिंह म्हणाला की, या स्पर्धेचा राजदूत बनणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.मला विश्‍वास आहे या चषकाची विजेता भारतीय संघ सर्वोकृष्ट कामगिरी करेल.आठ सदिच्छादूतांनी एकूण 1774 वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय 48 शतकांसह 51,906 धावा केल्या असून 838 विकेट्स घेतल्या आहेत.