चुलत भावावर कोयत्याने वार

0

खेड : जमिनीच्या वादातून चुलत भावाने लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी कोयाळी, खिरपाडवस्ती येथे घडली. बाबुराव नामदेव कोळपे (वय 27, रा. कोयाळी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अजय उर्फ बापू भाऊसाहेब कोळपे (रा. धनकवडी), राजेंद्र जांभळकर (रा. शिरूर) यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबुराव आणि आरोपी अजय या दोघांची कोयाळी येथे समायिक जमीन आहे. त्या जमिनीच्या वादातून अजय याने बाबुराव याच्या डाव्या हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. अजय आणि त्याच्या साथीदारांनी बाबुराव यांच्या कुटुंबियांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. भांडणात बाबुराव यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाली. आरोपींनी मारहाण करून निघून जाताना कार मधून पिस्तूल दाखवून बाबुराव आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Copy