चुनवाडेच्या इसमाची विषारी द्रव सेवन करून आत्महत्या

सावदा : रावेर तालुक्यातील चुनवाडे येथील रामदास डिगंबर झाल्टे (55) यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान सोमवार, 8 ऑगस्ट रोजी प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार विजय पोहेकर करीत आहेत.