चुकीचे बूट घातल्यामुळे गमावले बक्षिसात मिळालेले बेट

0

ओहायो । अमेरिकेच्या एका रग्बीपटूला त्याच्या दुर्लक्षामुळे म्हणा की,त्याच्या दुर्देवामुळे 6 कोटीच्या बक्षिसाला मुकावे लागले. दैव देते पण कर्म नेते या म्हणीची प्रचिती येते. रग्बीपटू जॉन रॉस याने चुकीचे जोडे घातल्यामुळे बक्षिसामध्ये मिळालेले एक बेट गमवावे लागले आहे. जे बेट त्याला बक्षिसामध्ये मिळाले होते, त्या बेटाची मालकी त्याला देण्यातही येणार होती. मात्र त्याच्या ते नशिबात नव्हते. 40 मीटर धावण्याच्या स्पर्धेत विक्रमी वेळेत पूर्ण करणार्‍या खेळाडूला बेट देण्याचे बूट बनवणार्‍या आदिदास कंपनीने जाहीर केले होते.

ही स्पर्धा अमेरिकेच्या रॉसने विक्रमी वेळेत पुर्ण केली. त्याच्या विक्रमावर शिक्कामोर्तबही झाले. पण आदिदास कंपनीने रॉसला बेट दिले नाही. कारण त्याने धावण्यासाठी आदिदासची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या नाईकेचे बूट घातले होते.आदिदासने या धावण्याच्या स्पर्धेसाठी नियम तयार केले होते, रॉसने जे बहुधा वाचले नव्हते. या नियमांमध्ये स्पष्टपणे लिहले होते की धावण्यासाठी स्पर्धकाला आदिदासचेच बूट घालावे लागतील.