चुकीचा इतिहास दाखविणार्‍यांवर कडक कारवाई करा

0

नवापूर । राजमाता राणी पद्मावती यांचा चुकीचा इतिहास दाखविल्याबाबत नवापूर शहरातील महाराणा प्रताप युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन दिले. सोबत सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा उपस्थित होते. निवेदनामध्ये म्हटले आहे की इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखविणार्‍या या चित्रपटावर आक्षेप घेतला असुन या चित्रपटात चित्तोडगदचे राजे रतनसिंह यांची पत्नी राणी पद्मावती आणि मुघल आक्रमक अलाउद्दीन खिलजी यांच्यावर आधारीत प्रेम प्रसंग दाखविण्यात आले आहे. हे संपूर्णपणे इतिहासाचे विकृतीकरण आहे. काल्पनिकतेच्या नावाने इतिहास तथा वास्तव टाळून विकृतपणे इतिहासाची छेडछाड करून भारतीय संस्कृतीवर हल्ला करण्याची हिम्मत करणे हा अतिरेक आहे, यामुळे चुकीचा इतिहास दाखविणार्‍यांवर कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.

वंदनीय व्यक्तीची विटंबना राष्ट्रीय अस्मितेस बाधक
वंदनीय व्यक्तीची विटंबना राष्ट्रीय अस्मितेस बाधक असून सर्वस्वी निषेधार्ह आहे. व्यथा व वेदनांचे रूपांतर लोंकाच्या उद्रेकात होण्यापुर्वी त्यांची दखल शासनाने घेऊन संबंधितास समज देण्याची गरज आहे. चित्रपटातून सदर वादग्रस्त दृश्य वगळावे अशी मागणी युवासेनेने केली आहे. तसे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करून असा इशारा देण्यात आला आहे. खर्‍या इतिहासाचा आधार घेवूनच चित्रपट प्रदर्शित करावा व आक्षेपार्ह असणारे सर्व दृश्य वगळावे अन्यथा चित्रपट प्रदर्शित होवू दिला जाणार नाही. तसेच इतिहासाची मोडतोड करून विकृत इतिहास दाखविण्याचा प्रयत्न संजय लीला बन्साली व त्यासारखे निर्माते व दिग्दर्शकांवर सेन्सॅर बॉर्ड ऑफ इंडिया व केंद्र शासनाने कठोर कारवाई करावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदन देते वेळी अनंत पाटील, हिमाशु पाटील, हेमंत पाटील, प्रेमेंद्र पाटील,विशाल पाटील, चंद्रेश पाटील,दर्शन पाटील,प्रशांत मोरे, राकेश पाटील,सागर पाटील,अनिल पाटील,निखील पाटील,मनिष पाटील,अमित पाटील,महेश पाटील, दर्पन पाटील,हरीष पाटील, संकेत पाटील, रूपेश पाटील, हेमंत पाटील, मयुर पाटील,भटु पाटील आणि असंख्य राजपूत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.