Private Advt

चुंचाळे गावातून पशूधनाची चोरी

यावल : शेतकर्‍याच्या घरा बाहेर बांधलेली बैल जोडी अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी तालुक्यातील चुंचाळे गावात उघडकीस आला. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. चुंचाळे येथील शेतकरी अशोक साहेबराव धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सात वर्ष वयाची 20 हजार रूपये किंमतीची बैल जोडी त्यांनी सोमवारी रात्री घराबाहेर बांधली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. तपास हवालदार सुनपील तायडे करीत आहेत.