चीनला झुगारून रशियाचा भारताला एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम देण्याचा निर्णय

0

नवी दिल्ली:भारत आणि चीन दरम्यान लडाख सीमेवर तणावाचे वातावरण आहे. यापूर्वी चीनच्या सरकारी वृत्तपत्रात रशियाने भारताला शस्त्रास्त्र न पुरवण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंती ला झुगारून देत रशिया लवकरच अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.

“रशियाच्या उपपंतप्रधानांशी माझी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. कोरोनासारख्या संकटानंतरही द्विपक्षीय संबंध दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. तसेच बऱ्याच बाबींमध्ये ही कामं लवकरच पूर्ण केली जातील,” असे सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी पीपल्स डेलीनं रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले होतं. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रं देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्रानं फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिलं होतं.

Copy