चीनला जाणार्‍या भारताच्या शिष्टमंडळात रावेरच्या उपनगराध्यक्षांचा सामावेश

0

2018 युथ लीडर परीषद प्रतिनिधी म्हणून अ‍ॅॅड.सुरज चौधरी यांना संधी

रावेर- चीन आणि भारत देशाचे मैत्रीचे संबंध मजबूत व्हावेत यासाठी भारतात युवा नेतृत्व निर्माण करणार्‍या रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी व चीनच्या अ‍ॅॅकेडमी फॉर वर्ल्ड वॉॅच या दोन संस्थाच्या माध्यमातून दोन देशातील संकृती आणि विचार यांचे आदानप्रदान होण्याच्या उद्देशाने चीनकडून आयोजित समारंभात भारतातील सात जणांचे शिष्टमंडळ 27 नोव्हेंबर रोजी चीनला रवाना होणार आहे. त्यात रावेर पालिकेचे उपनगराध्यक्ष अ‍ॅॅड.सुरज चौधरी यांचा समावेश आहे. मुंबईची रामभाऊ म्हाळगी या संस्थेच्या माध्यमातुन सुरज चौधरी यांच्या समावेशाने रावेरचे नाव देशात झळकणार आहे.

यांचा दौर्‍यात समावेश ; 27 रोजी शिष्टमंडळ चीनला रवाना होणार
रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे मुख्य कार्यकारी व प्रकल्प अधिकारी रवी पोखरणा, भाजपच्या प्रोफेशनल सोशल मिडिया सेलचे दिल्लीतील अंबर स्वामी, इंदौर येथून महिला हक्क आणि संरक्षण कार्यकर्ता डॉ.दिव्या गुप्ता, जम्मू काश्मीर येथून डॉ.संदीप मावा, सुप्रीम कोर्ट व मानवाधिकारचे विशेष सरकारी वकील रंजित सांगळे, बदलापूर येथून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे मिडिया प्रमुख मिलिंद धारवाडकर,यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ भारतातून रामभाऊ म्हाळगी प्रबोधानीचे महासंचालक रवींद्र साठे यांच्या मार्गदर्शनाने चीन दौर्‍यावर जात आहे. शिष्टमंडळ 27 रोजी मुंबई येथून शांघाई, 28 नोव्हेंबरला शांघाईतील अ‍ॅॅकेडमी फॉर वर्ल्ड वॉॅच या संस्थेला भेट, 29 रोजी शांघाई इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज या ठिकाणी भेट, 30 रोजी चीन मध्ये सुरू असलेल्या नानजिंग येथून बुलेट ट्रेन प्रवास व चीन संस्कृती बाबत माहिती घेतली जाणार आहे. 2 रोजी शांघाई ते मुंबई परतीचा दौरा असणार आहे.

युवा नेतृत्व निर्माण करण्याच्या कामामुळे अ‍ॅड.चौधरींना संधी
स्व.प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून दरवर्षी युवा नेतृत्व निर्माण करण्याचे काम केले जाते. या संस्थेशी सुरज चौधरी 3 वर्षापासून जुळले आहे. त्यांनी नेतृत्व साधना शिबिर व अंदमान-निकोबार येथे झालेले वन नॅॅशन, वन इलेक्शन, मिशन 2022 मध्येदेखील सहभाग नोंदवला होता. यात देशातील 120 लोकांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी अ‍ॅड.सुरज चौधरी यांना देण्यात आली होती. रावेर पालिकेत उपनगराध्यक्ष पदावरून राबवलेल्या विविध उपक्रम, स्वच्छता अभियान यामुळे त्यांची निवड झाली आहे. या शिष्टमंडळात समाविष्ट असलेले सात प्रतिनिधी उच्चविद्याभूषित असून, त्यांचे निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम असल्याने त्यांचा चीनच्या दौर्‍यात समावेश करण्यात आला आहे.